By  
on  

'५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार' सोहळ्यात अभिनेत्रींच्या दिलखेचक परफॉर्मन्सने जिंकली प्रेक्षकांची मनं

प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रींचे सुंदर परफॉर्मन्स प्रेक्षकांना नेहमीच पाहायला मिळतात. अभिनय कौशल्य आणि सौंदर्यवती आपल्या मराठमोळ्या सिनेतारका नृत्यकौशल्यात पण अव्वल आहेत. 

'५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार' प्रदान सोहळ्यात ‘माळ्याच्यामळ्यामंदी कोण गं उभी... कोल्हापूर से आई हू... कोंबडी पळाली’ या गाण्यांवर मराठमोळ्या अभिनेत्रींनी धमाकेदार परफॉर्मन्स दिला आहे. 

अभिनेत्री पूजा सावंत, वैदेही परशुरामी, अंकिता लोखंडे, किरण ढाणे आणि प्रणाली घोगरे यांनी या पुरस्कार सोहळ्यात एका पेक्षा एक सुंदर परफॉर्मन्स दिले आहेत. तर त्यांच्या नटखट, दिलखेचक अदा येत्या २३ जून रोजी दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता  प्रेक्षकांना सोनी मराठीवर पाहता येतील. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive