By  
on  

५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार : समीर-विशाखा यांच्या विनोदी सादरीकरणाने झाला हास्यकल्लोळ

कोणताही सोहळा हा हास्याशिवाय अपूर्ण असतो... जिथे निखळ हास्य आहे तिथे सर्वकाही मनोरंजक आहे असं म्हणायला हरकत नाही. हसण्यापेक्षा समोरील व्यक्तीला सहज पध्दतीने हसवणं हे फार कठीण काम आणि एक कला आहे.

हे कठीण काम सोप्पं करण्यात मशहूर असलेले आणि ही कला अंगी जोपासलेले कलाकार म्हणजे समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार. कलाकार म्हणून हे दोघेही उत्तम आहेतच पण जेव्हा यांची जोडी एकत्र येते तेव्हा अक्षरश: हास्याचा धुमाकूळ उठतो.

समीर आणि विशाखा या जोडीचे एका पेक्षा एक भन्नाट परफॉर्मन्स महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या सोनी मराठीवरील कार्यक्रमात पाहिलेच आहेत. आता ही जोडी '५६वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार' प्रदान सोह‍ळ्यात पुन्हा एकदा दमदार परफॉर्मन्स देणार आहेत. यांच्या अभिनयाने पुरस्कार सोहळ्यात झालेला हास्यकल्लोळ प्रेक्षकांना सोनी मराठीवर येत्या २३ जूनला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता पाहता येईल.

Recommended

PeepingMoon Exclusive