By  
on  

'मीडियम स्पाइसी'च्या टीमने सईला दिलं बर्थडे सरप्राईज

आगामी मीडियम स्पाइसी’' या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकरचा वाढदिवससिनेमाच्या टीमने अनोख्या पद्धतीने तिला सरप्राईज देत साजरा केला. या वेळी सिनेमाच्या संपूर्ण टीमने सईला कुठलीही जाणीव न होऊ देता वाढदिवसाचे नियोजन केले होते. 
सिनेमाचे अर्जंट शूट असल्यामुळे सर्व कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी सेटवर एकत्र यावे असे सांगण्यात आले, मात्र सई तिथे आल्यावर आज शूटींग नसून ही सर्व मंडळी आपला वाढदिवस एक दिवस आधी साजरा करण्यासाठी एकत्र जमल्याचे समजताच तिला आश्चर्याचा धक्का बसला.

या वेळी सिनेमाच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणाल्या, “आम्ही सईचा वाढदिवस मुद्दाम आधी साजरा केलाकारण सईला तिच्या वाढदिवशी असणारे तिचे प्लॅन्स बदलावे लागू नयेत. सई वगळता सेटवर सर्वांना या सरप्राईजची पूर्व कल्पना होती. अशा आनंदाच्या प्रसंगी सर्वांनी सईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत केकचा आस्वाद लुटला.” 

 

मोहित टाकळकर दिग्दर्शित मीडियम स्पाइसी’ या सिनेमात सई ताम्हणकर बरोबरच अभिनेता ललित प्रभाकरअभिनेत्री पर्ण पेठे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे चित्रीकरण सध्या अंतिम टप्प्यात असून सिनेमाचा मोठा भाग चित्रित झाला आहे.

 

Recommended

PeepingMoon Exclusive