By  
on  

जाणून घ्या, आर.के स्टुडिओ विकायला निघालेले कपूर काय म्हणतायत

बॉलिवूडला अनेक शानदार सिनेमे दिलेला सर्वात जुना आणि प्रसिध्द असा आर.के स्टुडीओ आता लवकरच विकला जाणार आहे. जवळपास 70 वर्षांपासून सिनेमांची मायानगरी अनुभवणा-या या आर.के स्टुडिओला मागच्यावर्षी भीषण आग लागली होती, या आगीत स्टुडिओचा एक मोठा भाग जळून खाक झाल्याने नुकसान झाले होते. म्हणूनच याची डागडुजी करणं उचित नसल्याचे समजून कपूर परिवाराने हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कळते. अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवत ‘शो मॅन’ म्हणून प्रसिध्द असलेले अभिनेता राज कपूर यांनी आर.के.स्टुडिओची स्थापना केली होती.

आर.के स्टुडिओ विकण्यासंदर्भात जेव्हा अभिनेत्री करिना कपूरला विचारण्यात आलं, तेव्हा ती म्हणाली “ मला हा स्टुडिओ का विकला जातोय याबाबत फारसं काही माहित नाही. नक्की काय सुरुय याचा मला नेमका अंदाज नाही. गेले 4-5 दिवस मी माझ्या वडिलांनासुध्दा भेटली नाहीय. पण आर.के स्टुडिओतच आम्ही लहानाचे-मोठे झालो आहोत, एवढं मात्र नक्की सांगू शकते. जर आमच्या परिवाराने कुठला निर्णय घेतला असेल तर तो विचारपूर्वकच असेल. माझे वडिल आणि इतर परिवार योग्य तोच निर्णय घेतील.”

पीटीआयशी बोलताना रणधीर कपूर म्हणाले होते, “हो आम्ही आर.के स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. तो आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. मागच्या वर्षीच्या आगीनंतर स्टुडिओची दुरूस्ती करणं, हे आर्थिक स्वरुपात नीट बसत नाही.”

तर नुकतंच कुटुंबियांच्यावतीने अभिनेते ऋषी कपूर म्हणाले, “ संपूर्ण कपूर परिवार या निर्णयाबाबत फारच भावनिक झाला आहे. आम्ही या स्टुडिओसोबत जोडले गेले आहोत. आमच्या पुढच्या पिढीचं काही माहित नाही. पण काळजावर दगड ठेऊन आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive