बॉलिवूडचा एनर्जी मॅन म्हणून ओळखला जाणारा सर्वांचा लाडका अभिनेता रणवीर सिंहचा आज 6 जुलै हा वाढदिवस. सर्वच स्तरातून त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मग मराठी सिनेसृष्टीतले कलाकारसुध्दा ह्यात कसे मागे राहतील बरं. अभिनेत्री अमृता खानविलकर आणि रणवीर सिंहची मैत्री तर सर्वांनाच माहितीय. पण आता 83 द फिल्मच्या निमित्ताने अभिनेता आदिनाथ कोठारे आणि रणवीर एकत्र काम करतायत.त्यामुळे त्या दोघांमधला बॉंडसुध्दा मस्त जुळला आहे.
अभिनेत्री अमृताने तर आपल्या आणि रणवीर दीपिकाच्या पहिल्या भेटीचा अविस्मरणीय सुखद अनुभव त्याच्या वाढदिवसानिमित्त शेअर केले आहेत.