By  
on  

वडील-मुलाचं हृदयस्पर्शी नातं सांगणारा संजय दत्तच्या बाबाचा असा आहे, टीझर

बॉलीवूडचा 'बाबा' संजय दत्त मराठी सिनेसृष्टीत निर्माता म्हंणून पदार्पण करतोय. तेव्हापासून त्याच्या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. अखेर संजय दत्तची निर्मिती असलेल्या 'बाबा' या सिनेमाचा टीजर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'भावनेला भाषा नसते' अशी टॅगलाईन असलेला हा टीजर प्रेक्षकांचं मन जिंकत आहे. 

या टीजरमध्ये एक छोटा मुलगा ज्याला बोलता येत नाही तो आपल्या आई-बाबांसोबत छोट्या गावात आनंदात जगताना दिसतो. हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता ज्याने 'हिंदी मीडियम' आणि 'तनू वेड्स मनू' सारख्या सिनेमांमध्ये स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली असा दीपक डोब्रियाल या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. 

 

दीपकसह या सिनेमात नंदिता पाटकर, चित्तरंजन गिरी, स्पृहा जोशी, अभिजित खांडकेकर आणि बालकलाकर आर्यन मेंघजी यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

संजय दत्त यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवरून टीझरबद्दल बोलताना म्हटले आहे की ‘आमची पहिली मराठी चित्रपट निर्मिती ‘बाबा’चा टीझर दाखल करत आहोत’. तर मान्यता दत्त यांनी ‘बाबा’चा टीझर प्रकाशित, निरागसतेची अत्यंत सुंदररीत्या विणलेली कथा’ असे ट्वीट करत म्हटले आहे.

 ‘ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स’चे अशोक सुभेदार म्हणतात की, “ह्या चित्रपटाच्या मनिष सिंगने लिहिलेल्या मूळ कथेला राज गुप्ता ह्यांचे उत्तम दिग्दर्शन लाभले आहे. आणि कोकणातल्या निसर्गरम्य चित्रीकरणामुळे ते अधिकच खुलले आहे’.

राज गुप्ता यांचं दिग्दर्शन असलेला संजय दत्त आणि मान्यता दत्त यांची निर्मिती असलेला 'बाबा' हा सिनेमा २ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive