By  
on  

पाहा मल्टीस्टारर 'झिम्मा'चं पहिलं पोस्टर, हे कलाकार झळकणार एकत्र

मराठी सिनेमांमध्ये सध्या नवनवीन आणि हटके विषय प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच मल्टीस्टारर सिनेमांचा ट्रेंड सध्या मराठी सिनेविश्वात सुरु आहे. या ट्रेण्डमध्ये लवकरच मराठी प्रेक्षकांच्या भेटीला 'झिम्मा' हा सिनेमा येणार आहे. 

'झिम्मा' सिनेमात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, निर्मिती सावंत, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सायली संजीव, सोनाली कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले आदी कलाकार झळकणार आहेत. मराठी कलाकारांची ही फौज बघून प्रेक्षकांना या सिनेमाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

या सिनेमाचं दिग्दर्शन हेमंत ढोमे करत आहे. तसेच क्षिती जोग आणि स्वाती खोपकर यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमा पुढील वर्षी २०२० साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive