By  
on  

प्रादेशिक सिनेमांमध्ये प्रयोगशीलतेला जास्त वाव: दीपक डोब्रियाल

दीपक डोब्रियाल यांनी अनेक हिंदी सिनेमांमधून अभिनयाची छाप पाडली आहे. ओमकारा, तनु वेड्स मनू, हिंदी मेडियम, गुलाल, दिल्ली 6 या सिनेमातील अभिनयासाठी ते ओळखले जातात. आता ते मराठी सिनेमात अभिनयाचा ठसा उमटवण्यास सज्ज झाले आहेत. दीपक ‘बाबा’ या मराठी सिनेमात दिसणार आहेत.

प्रादेशिक सिनेमांविषयी बोलताना ते म्हणतात, प्रादेशिक सिनेमे आतील कलाकाराला आणखी नवे प्रयोग करायला वाव देतात. याउलट बॉलिवूड्ची यशाची समीकरणं काहीशी वेगळी असल्याने कलेला कमी वाव असतो. मी अनेक मराठी दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. ते कामाबाबत खुपच समर्पित असतात. या सिनेमात मी नंदिता धुरी, अभिजीत खांडकेकर, स्पृहा जोशी यांसारख्या उत्तम कलाकारांसोबत काम करत आहे. मी त्याबाबत स्वत:ला सुदैवी समजतो.’

Recommended

PeepingMoon Exclusive