मराठी कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर ‘म्हाडा’ मेहेरबान, देणार घरं

By  
on  

एखाद्या सिनेमाच्या निर्मितीमागे केवळ कलाकार आणि दिग्दर्शकच नाही तर तंत्रज्ञांचंही अमुल्य योगदान असतं. पण अनेकदा पडद्यामागच्या शिलेदारांकडे प्रसिद्धीचा झोत येत नाही. पडद्यामागे तसेच पडद्यावर दिसणा-या कलाकारांवर ‘म्हाडा’ मात्र मेहेरबान झालं आहे. म्हाडा तर्फे मराठी कलाकार आणि तंत्रज्ञानांना घरं दिली जाणार आहेत.

म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी अलीकडेच ही घोषणा केली. उदय सामंत आणि  शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं. पुणे, नागपूर औरंगाबाद आणि नाशिक येथील कलाकारांना विरार येथील घरं दिली जाणार असल्याचं समोर आलं आहे. यावेळी आदेश बांदेकर यांनी कलाकरांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकल्याचं दिसतं. यावेळी म्हाडाचा हा निर्णय मराठी कलाकारांसाठी उत्तम असल्याचं आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केलं.

Recommended

Loading...
Share