अश्विनी पुन्हा येणार !....... पण आता एका हटके अंदाजात

By  
on  

बॉलिवूडमध्ये सध्या रिक्रिएशनचा ट्रेंड जोरात आहे. जुनं गाणं नव्या चालीत आणि नव्या ढंगात पेश करण्याच्या प्रयोग जवळपास प्रत्येक बॉलिवूड सिनेमात दिसून येत आहे. पण रिक्रिएशन केवळ हिंदी सिनेमातच नाही तर मराठीतही येऊ घातलं आहे. मराठीत रिक्रिएट होत असलेलं गाणं ही तितकंच धमाल आहे. 1987 साली आलेल्या ‘गम्मत जम्मत’ या सिनेमातील ‘अश्विनी ये ना...’ हे गाणं रिक्रिएट होत आहे. ‘येरे येरे पैसा 2’ या सिनेमात हे गाणं रिक्रिएट होत आहे.

 

मूळ गाणं चारुशीला साबळे आणि अशोक सराफ यांच्यावर चित्रीत झालं होतं. अण्णा परत येतोय अशी कॅची टॅगलाईन घेऊन उत्सुकता निर्माण केलेल्या ‘ये रे ये रे पैसा २’ या सिनेमाबद्द्ल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, पर्पल बुल एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओज आणि पॅनारोमा स्टुडिओज ची निर्मिती असलेल्या "ये रे ये रे पैसा २" या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत ढोमेने केले आहे. या सिनेमात संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर हे कलाकार आहेत. हा धमाल सिनेमा ९ ऑगस्टला हा रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share