By  
on  

OMG! तेजस्विनी पंडीतने मारला सई ताम्हणकरला टोमणा ; दोघींमध्ये सुरूय ‘कांटे की टक्कर’

सिनेसृष्टीत दोन अभिनेत्रींचं एकमेकींशी कधीच पटत नाही, असं म्हणतात. त्यांच्यात विस्तवसुध्दा जात नाही. एकीला महत्त्व दिलं तर दुसरीच्या नाकावर लगेच राग येतो. एकमेकींचा मत्सर आणि द्वेष करण्यातच त्या धन्यता मानताता. सिनेमांच्याबाबतीत तर या अभिनेत्रींमध्ये नेहमीच चढाओढ लागलेली आपल्याला दिसून येते. एकमेकींच्या नेहमीच एक पाऊल पुढे राहण्याचा प्रयत्न त्या करताना दिसतात.असंच काहीसं मराठीतल्या दोन आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घडल्याची प्रचिती नुकतीच आली आहे.


अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि सई ताम्हणकरमध्ये संजय जाधव यांच्या सिनेमात काम करण्यावरुन चांगलंच जुंपल्याचं समजतंय. नुकतंच तेजस्विनी पंडीतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात ती चक्क सई ताम्हणकरला टोमणा मारतेय. तेही सईचं नाव न घेता ती म्हणतेय, “तिला काय वाटलं तिला संजय दादा ‘लकी’साठी निवडेल. ती होती का, ‘येरे येरे पैसा’मध्ये? ‘तू ही रे’ आणि ‘येरे येरे पैसा’ दोन बॅक टू बॅक हिट सिनेमे दिले आहेत मी. गुलाबाची कली कोण आहे, मी ना..मग मीच आहे. ‘लकी’ सिनेमाची नायिका.

https://twitter.com/tejaswini_tweet/status/1035179010152648704

तेजस्विनी पंडीत आणि सई ताम्हणकरमध्ये ‘लकी’ सिनेमात भूमिका साकारण्यावरुन चांगलीच ‘कांटे की टक्कर’ झालेली यातून दिसतेय. आता या दोघींपैकी नेमकी कोण नायिका ‘लकी’ सिनेमात पाहायला मिळणार की या आगामी सिनेमासाठीची ही काही स्ट्रॅटेजी आहे, ते येणारा काळ ठरवेलच. तोपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता अशीच ताणून राहील.
‘लकी’ सिनेमाबातची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे समजते

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive