By  
on  

रसिका सुनीलनंतर ही होणार गुरुनाथची नवीन शनाया

राधिकाभोवती शनीच्या पिडेसारखी मागे लागलेली शनाया हे ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतील लोकप्रिय व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री रसिका सुनीलने या मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर तिच्या जागी कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार हा संपूर्ण मनोरंजनविश्वाला भेडसावणारा प्रश्न होता.

शनाया म्हटलं की, गुरूनाथच्या अवती-भोवती सतत घुटमळते आणि तोही तिचे मुलगा अथर्वपेक्षा बच्चा-शोना करत जास्त लाड पुरवतो. शनाया या मालिकेतील निगेटिव्ह भूमिका असली तरी तिच्या भूमिकेत एक आजच्या पिढीचं नेतृत्व करण्याचं वेगळेपण जपण्यात आलं आहे. म्हणूनच शनायाचे पात्र आता कोण साकारणार याबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या. सर्वांनाच याची उत्सुकता होती .पण नुकताच यावरचा पडदा उठला आहे. ‘जय मल्हार’ मालिकेतून बानू या भूमिकेव्दारे प्रेक्षकांचं मन जिंकणारी अभिनेत्री ईशा केसकर ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतील नवीन शनाया असणार, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडीयाने दिले आहे.

ईशा केसकरने जय मल्हार या आपल्या पहिल्याच मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. त्यामुळे शनाया या घराघरात लोकप्रिय ठरलेल्या पात्राला ईशा योग्य न्याय देईल असं सर्वत्र बोललं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे शनाया म्हणून ईशाची मालिकेतील एन्ट्री देखील दमदार आणि हटके असणार अशी माहिती टीव्ही सूत्रांकडून मिळतेय.

https://www.instagram.com/p/Bm-s4oxBwzw/?taken-by=rasika123s

प्रेक्षकांचा प्रचंड तिरस्कार हेच शनाया हे पात्र साकारणा-या रसिका सुनीलचं यश होत. परदेशी शिक्षण घेण्यासाठी तिला ही मालिका सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. तिलासुध्दा ही मालिका सोडताना प्रचंड दु:ख झालं. तिने याबाबत सोशल मिडीयावर एक पोस्ट करत, आपलं दु:ख व्यक्त केलं.तसंच शेवटचे तिचे भागसुध्दा आवर्जुन पाहण्यास सांगितलं आहे. तुम्हा रसिकांचं माझ्यावरचं प्रेम आणि विश्वास हीच माझी ताकद आहे,असं भावूक होत रसिका म्हणाली.

Author

Recommended

PeepingMoon Exclusive