भल्या भल्यांना ठगायला येतीये ही जोडी पाहा ‘अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी’

By  
on  

झी मराठी वाहिनीने नेहमीच हटके विषयांवरील मालिका रसिकांच्या भेटीला आणल्या आहेत. आताही लोकांना गंडवण्यात कायम तत्पर असलेल्या दोन ठगांची गोष्ट घेऊन ते रसिकांच्यी भेटीला आले आहेत. ‘अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी’ असं या नव्या मालिकेचं नाव आहे. या निमित्ताने एक वेगळी मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे.

 

या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी शितली म्हणजेच शिवानी बावकर आणि चेतन वडनेरे ही जोडी रसिकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या मलिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यात दोन जोडपी एकमेकांशी एकमेकांशी घराच्या मालकीवरून भांडताना दिसत आहेत. त्यांना एकच घर दोन वेगवेगळ्या वेषातील लोकांनी विकलेलं असतं. तिथे आलेले पोलिस लगेच ओळखतात की हे काम अल्टी पल्टीचंच आहे. आता प्रेक्षकांना अल्टी पल्टीच्या कारनाम्याची धमाल या मालिकेत पाहता येईल. 7 ऑगस्ट पासून बुध ते शनि रात्री 10 वाजता ही मालिका रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share