By  
on  

दोन वर्षांनंतर अमृता सुभाष आणि नवाझुद्दीन सिद्दीकी 'सेक्रेड गेम्स 2' मध्ये एकत्र झळकणार

सध्या सगळीकडे प्रदर्शित होणाऱ्या 'सेक्रेड गेम्स 2'ची सध्या सगळीकडे चर्चा आहे. सरताज सिंग आणि गणेश गायतोंडे या दोघांमधल्या थरारक खेळाची रंजकता पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर  'सेक्रेड गेम्स 2' प्रदर्शित होणार आहे. 

'सेक्रेड गेम्स 2'विषयी एक रंजक माहिती अशी की या वेबसीरिजमध्ये एक मराठमोळा चेहरा दिसणार आहे तो म्हणजे अभिनेत्री अमृता सुभाष. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी की 'सेक्रेड गेम्स 2' निमित्ताने अमृता सुभाष आणि गणेश गायतोंडेच्या प्रमुख भूमिकेत असलेला नवाझुद्दीन सिद्दीकी हे दोन कलाकार २ वर्षांनी एकत्र झळकणार आहेत. २ वर्षांपूर्वी 'रमन राघव 2.0' या दोघे सोबत पाहायला मिळाले होते. 

'सेक्रेड गेम्स'च्या पहिल्या भागात अमृता सुभाषचा नवरा संदेश कुलकर्णी गणेश गायतोंडेंच्या पहिल्या बापाच्या भूमिकेत पाहायला मिळाला मिळाला होता. 'सेक्रेड गेम्स 2'मध्ये अमृता सुभाष झळकणार आहे. हा एक योगायोगच म्हणता येईल. 'सेक्रेड गेम्स 2' मधील अमृताची भूमिका नेमकी काय आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. अमृताने नुकतंच 'सेक्रेड गेम्स 2' मधील अभिनेत्री आणि नवाझुद्दिन सोबत एक ग्लॅमरस फोटोशूट केलं.

 

अमृता नुकतीच 'गल्ली बॉय' या सिनेमात रणवीर सिंगसोबत झळकली होती. एकूणच अमृता सध्या मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive