By  
on  

सुबोध भावेच्या नाटकाचा 15 ऑगस्टच्या प्रयोगाचा निधी सांगली, कोल्हापुर पूरग्रस्तांसाठी

सध्या सांगली कोल्हापुर परिसरात महापुराने धुमाकुळ घातला आहे. या पुरामुळे जनजीवन मोठ्याप्रमाणावर विस्कळीत झालं आहे. या लोकांच्या मदतीला देशभरातून लोक धावून येत आहेत. अभिनेता सुबोध भावेनेही यावेळी समाजभान जपलं आहे. सुबोध यावेळी त्याचे ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाचे सांगली कोल्हापुर सातारा भागातील दौरे रद्द केले आहेतच.

याशिवाय पुरग्रस्तांच्या मदतीसाठी त्याने ‘अश्रुंची झाली फुले’ या नाटकाचा खास शो आयोजित केला आहे. या शोमधून मिळालेलं उत्पन्न तो पुरग्रस्तांच्या निधीसाठी देणार आहे. 15 ऑगस्टला बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हा शो होणार आहे.

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. रवी जाधव, अभिजीत खांडकेकर यांनीही मदतीसाठी आवाहन केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive