By  
on  

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर गायिका सावनी रविंद्र घेऊन येतेय नवं गाणं

सावनी ही मराठीतली एक आघाडीची गायिका आहे. तिने आजवर अनेक मराठी तसेच इतर प्रादेशिक सिनेमांसाठी गायन केले आहे. गायनासोबत सावनी तिच्या फॅशनसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. संगीतामध्ये आणि गायनामध्ये सावनी नेहमी नवनवीन प्रयोग करुन चाहत्यांना सरप्राईज देत असते. 

येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून सावनी नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. 'वंदे मातरम-एक निश्चय' असं या गाण्याचं शीर्षक आहे. सावनीने स्वतःच्या सोशल मिडियावरून या नव्या गाण्याची माहिती दिली.

 

सावनी रवींद्रने हे नवं गाणं भारत देशाला समर्पित केले आहे. आपल्या उत्तम गायनशैलीने सावनीने आजवर रसिकांना नेहमीच मंत्रमुग्ध केले आहे. सावनीच्या या नव्या गाण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive