पाहा Video : रितेश देशमुख म्हणतो, 'हीच आपली संस्कृती आहे. जय हिंद,’

By  
on  

महाराष्ट्रात यंदा सांगली, कोल्हापूरमध्ये पुराने थैमान घातलं आहे. हजारो लाखोंच्या संख्येने या पुरामुळे नागरिक बेघर झाले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी आणि पुर्नवसनासाठी संपूर्ण महाराष्टातून मदतीचा ओघ सुरु आहे. पण तरीही ही मदत अपुरीच पडतेय. पण लष्कराच्या जवानांनी या क्रूर पूरपरिस्थितीमध्ये दाखवलेल्या प्रसंगावधनाचे आणि औदार्याचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. आपला जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचविणा-या जवानांना सांगलीतल्या मायभगिनींनी राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला.  

अभिनेता रितेश देशमुखने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा रक्षाबंधनाचा व्हिडीओ शेअर करत, "प्राण वाचवणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करत या महिला साहसी जवानांना राख्या बांधत आहेत. हीच आपली संस्कृती आहे. जय हिंद,’ असं म्हणत संवेदना व्यक्त केल्या आहेत. 

Recommended

Loading...
Share