रितेश- जेनिलियाने जपलं समाजभान, पुरग्रस्तांसाठी 25 लाखांचा धनादेश केला मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

By  
on  

सांगली कोल्हापुरात आलेल्या पुराने सगळा महाराष्ट्र हेलावला. देशभरातून महाराष्ट्रासाठी प्रार्थना आणि मदतीचा ओघ सुरु झाला आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने पुरग्रस्तांना मदत करत आहेत. मराठी सेलिब्रिटीही या कामात मागे नाहीत. या यादीत आता महाराष्ट्राचा लाडक्या माउलीचाही समावेश झाला आहे. रितेश आणि जिनिलिया देशमुखने अलीकडेच मुख्यमंत्री निधीमध्ये 25 लाखांचा निधी पुरग्रस्तांसाठी दिला आहे.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकतंच ट्वीट करून ही महिती दिली आहे. पुरग्रस्तांसाठी सगळीकडून मदत येत असताना इतर बाबतीत पुढे असणारे बॉलिवूड मात्र शांत आहे. यावर मनसेचे  चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी बॉलिवूड कलाकारांवर नुकतीच आगपाखड केली. महाराष्ट्राच्या जीवावर मोठ्या झालेल्या कलाकारांना स्वत:च्या कर्मभूमीचा विसर पडला आहे. अशी टीकाही अमेय खोपकर यांनी केली आहे.

Recommended

Loading...
Share