‘World Elephant day’ निमित्त पुजा सावंतने शेअर केला हा व्हिडियो

By  
on  

पुजा सावंत अलीकडेच ‘जंगली’ सिनेमातून रसिकांच्या भेटीला आली आहे. या सिनेमात तिने विद्युत जामवालसोबत स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमातील तिच्या कामाचं खुप कौतुक देखील झालं.  हा सिनेमा वन्य जीवन आणि त्यासंबंधी घडणा-या घटनांवर आधारलेला आहे. हत्ती आणि त्यांच्या सुळ्यांच्या तस्करीवर या सिनेमाने प्रकाश टाकला आहे.

 

या शुटिंगच्या दरम्यान पुजाची शंकरशी खास दोस्ती झाली आहे. काल जागतिक हत्ती दिवसाच्या निमित्ताने तिने एक व्हिडियो रसिकांशी शेअर केला आहे. या व्हिडियोत ती शंकर नावाच्या हत्तीची सोंड रंगवताना दिसत आहे. यावेळी त्याच्याशी संवाद साधताना, मायेने कुरवाळताना दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये पुजा म्हणते, ‘ मी स्वत:ला खुप भाग्यवान समजते की निसर्गाच्या एका सर्वोत्तम कलाकृतीसोबत आहे. जंगली सिनेमाच्या निमित्ताने मला यांच्या सानिध्यात वेळ घालवता आला. हे बंध कायमस्वरुपी आहेत. मी या सगळ्यांना खुप मिस करते.’ पुजा आगामी बोनस या मराठी सिनेमात दिसणार आहे. यात ती गश्मीर महाजनीसोबत स्क्रीन शेअर करेल.

Recommended

Loading...
Share