पाहा video: संजय जाधव यांनी आणलेलं हे ‘खारी बिस्किट’ तुम्हाला नक्कीच आवडेल!!!

By  
on  

दिग्दर्शक संजय जाधव त्यांच्या ‘खारी बिस्कीट’ सिनेमाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमाचं साँग लाँच सोहळा अलीकडेच पार पडला आहे. बिस्कीट आणि खारी अशी नावं असलेल्या बहीण भावावर हा सिनेमा बेतलेला आहे. यातील बहिणीला म्हणजेच खारीला दिसत नसतं. पण बिस्कीट तिला कसं जपतो हे या गाण्यात दाखवलं आहे.

 

‘लाडाची गं, प्रेमाची गं, एकुलती एक या बिस्कीटाची खारी गं’ असे या गाण्याचे बोल आहेत. कुणाल गांजावाला यांनी हे गाणं गायलं आहे. क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणं लिहिलं आहे. सुरज धीरज यांचं संगीत आहे. या सिनेमात वेदश्री खाडिलकर ही खारीच्या भूमिकेत आहे तर आदर्श कदम बिस्कीटच्या भूमिकेत दिसणार आहे.

संजय जाधव यांनी यावेळी प्रेक्षकांसमोर लव्हस्टोरी न आणता हटके सिनेमा आणला आहे. भावा-बहिणीची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे.हा सिनेमा झी स्टुडियोज आणि ड्रिमिंग 24*7 एंटरटेनमेंट यांची निर्मिती आहे. 27 सप्टेंबर 2019ला हा सिनेमा रिलीज होत आहे.

 

Recommended

Loading...
Share