By  
on  

भरत जाधव बनणार लखोबा लोखंडे, ‘तो मी नव्हेच’ पुन्हा रंगभूमीवर

भरत जाधव हरहुन्नरी कलाकार आहे. वेगवेगळ्या भूमिका साधण्यात त्याचा हातखंडा आहे. ‘सही रे सही’, ‘मोरुची मावशी’ या नाटकांनंतर भरत आणखी एका गाजलेल्या नाटकातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी साकारून अजरामर केलेली भूमिका म्हणजे लखोबा लोखंडेची. ‘तो मी नव्हेच’ या नाटकात त्यांनी साकारलेले लखोबा जुण्या जाणत्यांच्या आजही लक्षात आहेत.

ही भूमिका आता भरत साकारणार आहे. नाटकाचं दिग्दर्शन केदार शिंदे करणार आहे. पुढील वर्षी येत असलेल्या आचार्य अत्रेंच्या जयंतीचं निमित्त साधून या नाटकाचा शुभारंभ होणार आहे. यापूर्वी भरतने विजय चव्हाण यांनी साकारलेल्या मोरुची मावशी या सिनेमात मोरुच्या मावशीची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेलाही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ‘सही रे सही’ केल्यानंतर अनेकदा भरतच्या मनातही या नाटकात काम करण्याची इच्छा निर्माण झाली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive