By  
on  

उर्मिला मांतोडकरचा कोल्हापुर सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी मदत दौरा

सांगली कोल्हपुरात उद्भवलेल्या भीषण पुर परिस्थितीनंतर समाजाच्या अनेक स्तरातून पुर्नवसनासाठी हात पुढे येत आहेत. अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनेही ट्वीट करत लोकांना मदतीचं आवाहन केलं होतं. पण आता उर्मिलाने आवाहन ना करता थेट कृती करण्याचं ठरवलेलं दिसत आहे. त्यामुळे उर्मिला स्वत: सांगली कोल्हापुरच्या दौ-यावर निघाली आहे.

 

उर्मिलाने तिच्या टीमसोबत प्रवासातील फोटो शेअर केला आहे. या पोस्टला कॅप्शन देताना उर्मिला म्हणते, ‘एक सुंदर सकाळ तेव्हा असते ज्यावेळी मदत करणारे लोक तुमच्यासोबत असतात. सांगलीच्या वाटेवर.....’ उर्मिलाने यावेळेच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती.

 

Recommended

PeepingMoon Exclusive