By  
on  

मराठीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसेचा साखरपुडा, व्हायरल फोटोवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव

सोशल मिडियावर आपल्या हॉट आणि बोल्ड अंदाजाने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री नेहा पेंडसेने साखरपुडा उरकला आहे. नेहाने इटलीमध्ये तिचा साखरपुडा उरकला आहे. शार्दुलसिंग असं तिच्या भावी नव-याचं नाव आहे. इन्स्टावर शेअर केलेल्या फोटोमध्ये नेहा आणि शार्दुल एकमेकांच्या डोळ्यात पाहात आहेत. याचवेळी नेहाच्या हातात अंगठीही चमकत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

 

शार्दुल आणि नेहा बराच काळ एकमेकांना ओळखत असल्याचं शार्दुलच्या इन्स्टा अकाउंटवरील फोटोमधून दिसून येत आहे. त्याच्या घरातील कार्यक्रमांनाही तिची हजेरी दिसून येत आहे. आता ही जोडी लग्नाच्या बंधनात कधी अडकते याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Happily in love

A post shared by Shardul Singh Bayas (@shardulbayas) on

नेहाने चाईल्ड आर्टिस्ट म्हणून करीअरला सुरुवात केली होती. याशिवाय ती हसरते या हिंदी मालिकेतही दिसली होती. झी मराठीवरील भाग्यलक्ष्मी मालिकेतही तिने भूमिका साकारली होती. या शिवाय हिंदी मधील मे आय कम इन मॅडम? , पार्टनर्स सारख्या मालिकांमध्येही दिसली होती. याशिवाय तिने हिंदी बिग बॉसमध्येही हजेरी लावली होती.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Family

A post shared by Shardul Singh Bayas (@shardulbayas) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive