By  
on  

रक्षाबंधन Special: असं साजरं झालं मराठी सेलिब्रिटींचं रक्षाबंधन

आज सगळीकडे रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाचा एकदम उत्सवी माहोल आहे. प्रत्येकजण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. आज रक्षाबंधनही असल्याने भाऊ बहिणींमधील प्रेम सोशल मिडियावरही झळकत आहे. मराठी सेलिब्रिटीही या सेलिब्रेशनमध्ये मागे नाहीत. पाहुया त्यांचे भावंडांसोबतचे खास फोटो

शिवानी सुर्वे : शिवानी सध्या बिग बॉसच्या घरात असल्याने रक्षाबंधन सेलिब्रेट करू शकत नसली तरी तिच्या टीमने भावासोबतच्या फोटोंचं कोलाज सोशल मिडियावर शेअर केलं आहे. 

 

 

मयुरी वाघ: ‘ती फुलराणी’ फेम मयुरी वाघनेही भाऊ रोहीतसोबतचा फोटो शेअर करत रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

 

शशांक केतकर: हॅण्डसम अभिनेता शशांक केतकर आणि त्याची बहीण दीक्षा यांनी जोरदार रक्षाबंधन सेलिब्रेशन केलेलं दिसत आहे. यावेळी प्रियांकाने शशांक आणि दीक्षाचा त्याचा लहानपणीच्या रक्षाबंधनचा फोटोही शेअर केला आहे.

 

 

रुपाली भोसले : बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेली रुपाली भोसलेसाठी हे रक्षाबंधन खुप खास आहे. रुपालीने भाऊ संकेतसोबत फोटो शेअर केला आहे.

 

श्रेया बुगडे : श्रेयाने तिचा राखी भाऊ पियुष रानडे याच्यासोबत रक्षाबंधन सेलिब्रेट केलं आहे. श्रेयाने तिचा आणि पियुषचा प्रसन्न फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

तुम्हीं हो बंधु, सखा तुम्हीं @piyush_ranade_official ️

A post shared by Shreya (@shreyabugde) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive