By  
on  

'अनन्या'ची संघर्षगाथा आता रुपेरी पडद्यावर, रवी जाधव यांची निर्मिती

दर्जेदार आणि आशयघन सिनेमांसाठी लोकप्रिय असलेले दिग्दर्शक रवी जाधव लवकरच नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. परंतु यावेळी ते दिग्दर्शकाच्या भुमिकेत नसुन निर्मात्याची धुरा सांभाळणार आहेत. 

रंगभुमीवर सध्या गाजत असलेल्या 'अनन्या' नाटकाने नाट्यरसिकांकडुन अमाप लोकप्रियता मिळवली. प्रेक्षक आणि समीक्षकांनी 'अनन्या'ला अलोट प्रेम दिले. 'अनन्या'ची हीच संघर्षगाथा आता रुपेरी पडद्यावर साकार होणार आहे. रवी जाधव हे या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नमस्कार, आज ‘स्वातंत्र्य दिनाच्या’ शुभ समयी सादर आहे माझ्या नव्या चित्रपटाचे पहिले पोस्टर. मला खात्री आहे हा चित्रपट मनोरंजनासोबत लाखो तरुण-तरुणींना स्वातंत्र्य, स्वाभिमान आणि प्रखर इच्छाशक्तीची खरी व्याख्या समजवेल. आपला सर्वांचा आशिर्वाद असावा #Ananya

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial) on

मुळ नाटकाचे दिग्दर्शक प्रताप फड 'अनन्या' सिनेमाचीसुद्धा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. काल स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधुन रवी जाधव यांनी सोशल मिडीयावर 'अनन्या' सिनेमाचं पहिलं पोस्टर शेयर केलं. 

या सिनेमाबाबत अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. 'अनन्या'मध्ये कोणते कलाकार झळकणार हे सुद्धा अद्याप गुलदस्त्यात आहे. रवी जाधव यांचा यावर्षी प्रदर्शित झालेला 'रंपाट' हा सिनेमा बाॅक्स ऑफीसवर हवी तितकी कमाल दाखवु शकला नाही. त्यामुळे 'अनन्या'मधुन रवी जाधव दमदार कमबॅक करण्यास सज्ज आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive