By  
on  

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचं तिसरं पर्व रसिकांच्या भेटीला

आनंदाचे आणि हास्याचे क्षण  देणाऱ्या हास्यजत्रेचा नवा हंगाम १९ ऑगस्टपासून सोनी मराठीवर सुरू होणार आहेसोनी मराठीवर  लाँच झालेल्या प्रोमोमधून हास्यजत्रेतल्या गाजलेल्या स्पर्धकांच्या टोळीबरोबरचपरीक्षकांची या मंचावरील धमाल दिसतेयावरून हास्यजत्रेचा नवा हंगाम पूर्वीच्या दोन पर्वांच्या तोडीस तोड असेलयाचा अंदाज येतो.

 

 नव्या सिझनमध्ये दुसऱ्या पर्वाप्रमाणेच सोमवार - मंगळवार कलाकार स्पर्धकप्रेक्षकांना हसवतील तर इतर स्पर्धकांची विनोदबुध्दी बुधवार - गुरूवारी प्रेक्षकांसमोर येणार आहेया नव्या हंगामात सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक सोमवार - मंगळवारी सादर होणारे भाग जज करतील तरविनोदाचं अचूक टायमिंग असणारे मकरंद अनासपुरे आणि मेलोड्रामा क्वीन अलका कुबल बुधवार - गुरूवारच्या भागांत परीक्षकांच्या खुर्चीत बसणार आहेततर गेल्या दोन पर्वांची सूत्रसंचालिका प्राजक्ता माळी यापर्वातही सूत्रसंचालिकेची भूमिका बजावणार आहे.

 

दरम्यान हास्यजत्रेची गेली दोन पर्व सुपरहिट ठरली होतीदोन वेगळ्या ग्रुपमध्ये भरलेल्या या विनोदाच्या जत्रेत बऱ्याच नवीन चेहऱ्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलंहास्यजत्रेतले हे स्पर्धक तिसरं पर्व ही सुपरहिटकरण्यासाठी आता सज्ज झाले आहेततेव्हा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेचा हा नवा हंगाम पहायला विसरू नकासोमवार ते गुरुवार रात्री  वाजता  फक्त सोनी मराठीवर

Recommended

PeepingMoon Exclusive