By  
on  

ठरलं तर ! ‘कुसुम मनोहर लेले’ पुन्हा रंगभूमीसाठी सज्ज

 ‘कुसुम मनोहर लेले’ या नाटकाने काही वर्षांपूर्वी रंगभूमी तसेच समाजात खळबळ उडवली होती. विनिता ऐनापुरे’ यांच्या ‘नराधम’ या कादंबरी वर आधारलेल्या नाटकाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली होती. आता हे नाटक नव्या रुपात रसिकांच्या समोर येत आहे. या नाटकात पल्लवी पाटील, संग्राम समेळ आणि शशांक केतकर या कलाकारांच्या या नाटकात प्रमुख भूमिका असणार आहेत.

 

या नाटकाच्या जुन्या आवृत्तीमध्ये सुकन्या मोने, संजय मोने, गिरीश ओक, बाळ कर्वे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नाटकाचं लेखन अशोक समेळ यांनी केलं होतं. शशांक केतकरने स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने या सिनेमाचं पोस्टर शेअर केला आहे.  'महाराष्ट्र रंगभूमी' या निर्मिती संस्थेने या नाटकाची निर्मिती केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shashank Shirish Ketkar (@shashankketkar) on

 

हे नाटक दस-याच्या शुभमुहुर्तावर म्हणजेच 8 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे. संतोष कोचरेकर हे या नवीन आवृत्तीची निर्मिती करणार आहेत. तसेच प्रदीप मुळे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive