By  
on  

ऐतिहासिक भूमिका ते सामाजिक भान अशी आहे अभिनेत्री अश्विनी महांगडे

ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारताना कलाकारावर मोठी जबाबदारी असते. पण राणूआक्का साकारताना अभिनेत्री अश्विनी महांगडे ही जबाबदारी लीलया पेलली.

 

अश्विनी सर्वप्रथम ‘अस्मिता’ या मालिकेतून रसिकांच्या समोर आली. त्यानंतर तिने बॉईज सिनेमातूनही अभिनय कौशल्याचं दर्शन घडवलं. पण अश्विनी सर्वात जास्त प्रसिद्धीस आली ती राणूआक्कांच्या व्यक्तिरेखेतून.

 

 

भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळे या व्यक्तिरेखेलाही लोकप्रियता लाभली. अश्विनीने अलीकडेच शिव अवतारात फोटो शुट केलं आहे.

 

अश्विनीने केवळ अभिनयातच पारंगत नाही. तर तिने समाजभानही जपलं आहे. मासिक पाळी आणि आरोग्याबाबत जनजागृतीसाठी अश्विनीनं ‘माहवारी’ या वेबसीरिजची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.

 

 

विशेष म्हणजे मासिक पाळीविषयीच्या समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी ती अनेकदा मोहिमही चालवली आहे. समाजाचं आपण देणं लागतो या जाणीवेतून तिने ‘रयतेचे स्वराज्य परिपूर्ण किचन’ हा उपक्रमही सुरु केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

रास्ते बदलो मत, रास्ते बनाओ..! #Positive_Life #Blessings #ThankYouAll

A post shared by Ashwini Pradipkumar Mahangade (@ashwini_mahangade_official) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive