सुभाष घई दिग्दर्शित ‘विजेता’ सिनेमाचं शुटिंग आजपासून सुरु, सुबोध भावेने शेअर केला फोटो

By  
on  

सुभाष घई यांचे बॉलिवूडमधील सिनेमे आजही रसिकांच्या आठवणीत आहेत. पण त्यांनी काही यशस्वी मराठी सिनेमेही बनवले आहेत.  सुभाष घई यांनी त्यांच्या ,मुक्ता आर्टस् लि.तर्फ सनई चौघडे वळू आणि संहिता या तीन मराठी चित्रपटांची निर्मिती केली होती. संहिता या चित्रपटाला तर राष्टीय पुरस्कारही मिळालेला होता.

 

  
सुभाष घई आता ‘विजेता’ या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहेत. सुबोध भावे आणि पुजा सावंत, नेहा महाजन हे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचा मुहुर्त नुकताच संपन्न झाला आहे. हा मुहुर्ताच्या सोहळ्याचा फोटो सुबोध भावेने नुकताच शेअर केला आहे. यावेळी सुभाष घई, सुबोध भावेसह पुजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके हे उपस्थित होते. या सिनेमाचं पोस्टर काही दिवसांपुर्वीच लाँच केलं गेलं होतं.

 

 

 सिनेमाच्या पोस्टरमध्ये अ‍ॅथलॅटिक्स, सायकलिंग आणि बॉक्सिंग हे खेळ दिसत आहेत. ‘My Sports: My Soil: My Magic’ अशी या सिनेमाची टॅगलाईन आहे. अमोल शेटगे हा सिनेमा दिग्दर्शित करत आहेत. .निर्माते राहुल पुरी,सहनिर्माते सुरेश पै ,छायालेखक उदयसिंह मोहिते संगीत रोहन रोहन आणि संकलक आशिष म्हात्रे आहेत. हा सिनेमा 2020च्या 24 जानेवारीला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Recommended

Loading...
Share