By  
on  

सोनाली कुलकर्णीचा हा निळ्याशार समुद्राच्या पार्श्वभूमीचा फोटो पाहिला का?

कलाकाराचं आयुष्य झगमगत असलं तरी अनेकदा व्यस्त असतं. शुटिंग, इव्हेंट्समध्ये त्यांचा दिवस संपून जातो. पण त्यातूनही अनेकदा कलाकार स्वत:साठी वेळ काढतात. आता अप्सरा सोनाली कुलकर्णीचंच घ्या. तिनेही व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून सुट्ट्या एंजॉय करायचं ठरवलं आहे. सोनाली सध्या मॉरिशसमध्ये आहे.

 

 

मॉरिशसमधील ग्रीस ग्रीस बीचवर सोनाली सध्या एंजॉय करत आहे. या बीच वरचा फोटो पोस्ट करताना तिने भलं मोठं कॅप्शनही दिलं आहे. ती म्हणते, ‘विलाप करणा-या या दगडांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत आहे.’ सोनालीचा मॉरिशस दौरा बराच मोठा असल्याचं दिसत आहे.

 

काही दिवसंपुर्वी तिने तिने तेथील सेगा नृत्यावर थिरकतानाचा व्हिडियोही शेअर केला होता. त्यात काळा वनपीस घातलेली सोनाली तेथील पारंपरिक नृत्य सादर करणा-या कलाकारांसोबत थिरकत होती. काही दिवसांपूर्वी तिचे लंडन व्हेकेशनचे फोटो व्हायरल झाले होते. सोनालीच्या या लंडन ट्रीपच्या फोटोंना नेटिझन्सनीही भरपूर लाईक्सही दिले होते.

 

Recommended

PeepingMoon Exclusive