पुरग्रस्तांच्या पुर्नवसनासाठी अभिनेते महेश मांजरेकर यांचा पुढाकार, मुख्यमंत्र्यांकडे सोपवला निधी

By  
on  

सांगली- कोल्हापुरमधील पुर ओसरला तरी पुर्नवसन अजून बाकी आहे. पुराच्या पाण्यामुळे संसार उद्ध्वस्त झालेल्या लोकांच्या मदतीला येणा-यांची संख्या मोठी आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी कलाकारही मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. काही दिवसांपुर्वीच रितेश जेनिलिया, आमीर खान, लता मंगेशकर यांनी देखील मुख्यमंत्री पुरग्रस्त निधीमध्ये निधी देऊन योगदान दिलं आहे. .

या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. निर्माता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुख्यमंत्री निधीमध्ये 1 लाख 11 हजार रुपये दिले आहेत. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातात निधीचा चेक सोपवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्वीट करत महेश मांजरेकर यांचें आभार मानले आहेत. यापुर्वी रितेश जेनिलियानेही 25 लाख रुपये मुख्यमंत्री निधीमध्ये जमा केले होते. याशिवाय मंत्रीमंडळातील सदस्य आणि मुख्यमंत्र्यांनीही त्यांचा एकदिवसाचा पगार पुनर्वसन निधीमध्ये दिला आहे.

Recommended

Loading...
Share