जन्माष्टमी विशेष: मराठीतील ही गाणी तुम्हाला नक्कीच कृष्णाच्या प्रेमात पाडतील

By  
on  

खरं तर देवांची प्रतिमा आपल्या मनात सात्विक अशीच असते. पण कृष्णाने मात्र या प्रतिमेला छेद दिला. त्याची आपल्या मनातील प्रतिमाच आहे मुळात खोडकर अशी. कृष्णाने आजवर अनेक लीला केल्या. कधी लहान होऊन लोणी खाल्लं तर मोठं होऊन परमार्थाचं ज्ञान दिलं. याच कृष्णाच्या रंगात मराठी गीतकार नसले तर नवलच ! त्यामुळे मराठीतील अशीच कृष्णमय झालेली सदाबहार गाणी आम्ही तुमच्या भेटीला आणली आहे. 

•    अगं नाच नाच राधे :

 

गोंधळात गोंधळ सिनेमातील अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही सुश्राव्य वाटतं. अशोक सराफ आणि रंजना यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं या यादीत टॉप लिस्टला आहे.

•    झुलतो बाई रास झुला :

कृष्णाच्या आकाशासारख्या निळाईचं प्रत्येकालाच कौतुक वाटत असतं. त्याच्या निळाईतच गुंफलेलं हे गाणं त्यामुळेच अवीट आहे. जानकी सिनेमातील या गाण्याला लतादीदींच्या आवाजाने चार चांद लागले आहेत. 

•    राधा ही बावरी:

राधा आणि कृष्ण एकमेकांशिवाय कायमच अपुर्ण आहेत. त्यामुळेच जिथे कृष्णाचा उल्लेख तिथे राधेचं नाव अटळ आहे. त्यामुळेच कृष्णावर इतकी गीतं असताना स्वप्नील बांदोडकरच्या आवाजातील राधा ही बावरी हे गाणं आजही लाडकं आहे. 

•    कृष्ण जन्मला

: जन्माष्टमीला सगळीकडे कृष्ण जन्माची धमाल असते. त्याच्या वेगवेगळ्या रुपांचं, लीलांचं वर्णन या गाण्यातून केलं जातं. कान्हा सिनेमातील ‘कृष्ण जन्मला’ हे गाणं देखील तुम्हाला आवडेल यात शंका नाही. 

•    अरे कृष्णा, अरे कान्हा:

 YZ सिनेमातील रिप्राईज गाणं मनाला आजही आनंद देतं. हृषीकेश, सौरभ आणि जसराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं हटके आहे. 

•    कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी :

नटरंग सिनेमातील ही गवळण आजही कृष्ण लीलांची आठवण करून देताना दिसते. मथुरेच्या बाजारात जाणा-या गोपिकांची हंडी फोडणारा कान्हा या गाण्यातून भेटतो.

Recommended

Loading...
Share