येत्या दिवाळीत 'बिग बाॅस' फेम शिवानी सुर्वे अंकुश चौधरीसोबत जाणार 'ट्रिपल सीट'

By  
on  

बिग बाॅस मराठी 2 आता अंतिम टप्यात आला आहे. लवकरच या सीझनचा विजेता कोण होणार हे प्रेक्षकांना कळुन येईल. शिवानी सुर्वे या सीझनच्या फायनलला पोहोचली आहे. त्यामुळे शिवानीचे चाहते भलतेच आनंदात आहेत. 

या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. शिवानी सुर्वैचा आगामी सिनेमाची आज गोकुळाष्टमीच्या मुहुर्तावर घोषणा झाली आहे. 'ट्रिपल सीट' असं तिच्या आगामी सिनेमाचं नाव असुन शिवानीसह अभिनेता अंकुश चौधरी आणि अभिनेत्री पल्लवी पाटील प्रमुख भुमिकेत झळकणार आहेत. 

 

या सिनेमाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. संकेत पावसे दिग्दर्शित हा सिनेमा 24 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Recommended

Loading...
Share