By  
on  

स्वराज्याच्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट सांगणा-या ‘फत्तेशिकस्त’चा टीजर रिलीज

शिवरायांच्या गनिमी कावा या युद्धनितीने भल्याभल्यांची झोप उडवली. याच तंत्रावर बेतलेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा घेऊन दिग्पाल लांजेकर रसिकांच्या भेटीला आले आहेत. या सिनेमाचा टीजर नुकताच रिलीज झाला आहे. या टीजरमध्ये गनिमी काव्याने लढल्या गेलेल्या लढाईचं रोमहर्षक दृश्य दिसतात.

 

चिनमय मांडलेकर यांच्या तोंडी असलेल्या ‘आता थेट घुसायचं आणि गनिम तोडायचा...’ हा संवाद पेक्षकांच्या मनात स्फुर्ती निर्माण करेल यात शंका नाही.  मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे हे कलाकार आहेत. यापैकी मृणाल कुलकर्णी जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे तर मृण्मयी देशपांडे केशरच्या भूमिकेत दिसून येत आहे. हा रोमांचक सिनेमा 15 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive