By  
on  

प्रसाद ओक घेऊन येणार नवा सिनेमा ‘हिरकणी’ पोस्टर रिलीज

सध्या मराठी सिनेमात ऐतिहासिक सिनेमांची चलती आहे. फर्जंद सिनेमानंतर फत्तेशिकस्त हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. यासोबत आणखी एका ऐतिहासिक सिनेमाची घोषणा आज झाली आहे. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक ‘हिरकणी’ हा सिनेमा घेऊन रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या पटकथेचं लेखन चिन्मय मांडलेकर करत आहे.

प्रसादने नुकतंच या सिनेमाचं पोस्टर रिलीज केलं आहे. ‘कच्चा लिंबू’ नंतर प्रसाद हा सिनेमा दिग्दर्शित करत आहे. या सिनेमाच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये प्रसाद म्हणतो, ‘देव प्रत्येक ठिकाणी पुरा पडू शकत नाही, म्हणूनच त्यानं बनवली 'आई'...!!!
आई भवानी ला वंदन करून आज मातृदिना निमित्त सादर करीत आहोत..."हिरकणी"’ प्रसाद आणि चिन्मय यापुर्वी फर्जंद या सिनेमात एकत्र झळकले होते. प्रसादने या सिनेमाची तारीख अजून जाहीर केलेली नाही.

Recommended

PeepingMoon Exclusive