By  
on  

महेश मांजरेकर यांनी पुजा करून केली लंडनमध्ये ‘दे धक्का’च्या चित्रिकरणाला सुरुवात

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘दे धक्का 2’ची घोषणा केल्यापासून त्याबाबत पुढील आपडेटची रसिकांना उत्सुकता लागली होती. आता रसिकांचा उत्साह वाढवणारी बातमी समोर आली आहे. ‘दे धक्का 2’ लंडनच्या पार्श्वभूमीवर बेतलेली असल्याचं आम्ही तुम्हाला यापुर्वीच सांगितलं होतं. आता या सिनेमाचा मुहुर्त लंडनमध्ये नुकताच पार पडला आहे.

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुहुर्त केला आहे. यासोबतच सिनेमाच्या चित्रिकरणालाही सुरुवात झाली आहे. अमेय विनोद खोपकर एंटरटेन्मेंट आणि स्कायलिंक एंटरटेन्मेंट प्रस्तुत या चित्रपटाचे यतीन जाधव आणि स्वाती खोपकर निर्माते आहेत. तर निनाद नंदकुमार बट्टीन आणि तबरेट पटेल को प्रोड्यूसर, कर्मिका टंडन आणि विशिष्ठा दुसेजा असोसिएट प्रोड्यूसर आहेत. महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर दे धक्का २ चं दिग्दर्शन करणार आहेत.  हा सिनेमा 3 जानेवारी 2020मध्ये रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive