By  
on  

निर्माते संदीप टकले यांच्या दिग्दर्शनाचा 'जुगाड'

०२ आॅगस्ट २०१९ रोजी प्रदर्शित झालेल्या "माज" या चित्रपटाच्या यशस्वी प्रवास नंतर संदीप टकले आता "जुगाड"च्या तयारीत आहेत. लवकरच या चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. दिग्दर्शक संदीप टकले यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाची घोषणा केली आहे. 

अनुष्का इमॅजिन फिल्म्स या संस्थेकडून चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. चित्रपटातील कलाकारांची  नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.  सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलेल्या पोस्टरवरून "जुगा़ड" हा चित्रपट पैशाचा व्यवहार आणि त्यानंतर होणारी पळापळ यावर आधारित असल्याचं जाणवतं. 

लवकरच आता चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive