By  
on  

नेहा पेंडसेने साखरपुड्याच्या चर्चांवर पहिल्यांदाच सोडलं मौन, काय म्हणते ती जाणून घ्या

अभिनेत्री नेहा पेंडसेने बॉयफ्रेंड शार्दुलसोबतचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला आणि तिच्या साखरपुड्याच्या चर्चेला उधाण आलं. पण नेहाने यावर्चं मौन सोडलं आहे. एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहाने हे स्पष्ट केलं. नेहा म्हणते, ‘मी साखरपुडा केला नाहीये किंवा इतक्यात लग्नही करत नाहीये.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

मी आणि शार्दुलने एक प्लॅन केला होता तो यशस्वी झाला म्हणून ती शुभेच्छांची पोस्ट शेअर केली होती. मी शार्दुलला डेट करत आहे. पण इतक्यात लग्नाचा विचार नाही.’ या फोटोपुर्वी अभिजीत खांडकेकरनेही नेहाचा एक फोटो शेअर केला होता. यात नेहाने सीक्रेट लपवत असल्याचा हावभाव केला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Congratulations #buddies #sareelove #marathi

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

 

त्यामुळे नेहाने शार्दुलसोबत फोटो शेअर केल्यानंतर हेच सीक्रेट ती लपवत असल्याचा अनेकांचा समज झाला होता. याशिवाय नेहा हिंदी बिग बॉसच्या पुढील सीझनमध्ये दिसणार असल्याचीही चर्चा होती. पण नेहाने हे वृत्त फेटाळलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

MONDAY

A post shared by Neha Pendse (@neha.pendse) on

 

Recommended

PeepingMoon Exclusive