By  
on  

सलील कुलकर्णींचं नव्या कलाकृतीबद्दल सुतोवाच, सोबत शंकर महादेवन देखील

गायन क्षेत्रातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलेले गायक सलील कुलकर्णी यांनी नव्या कलाकृतीबाबत सुतोवाच केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत यावेळी शंकर महादेवनदेखील असणार आहेत. यासंबधीची पोस्ट सलील कुलकर्णी यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सलील म्हणतो, ‘नवीन कलाकृती ...एका निर्मळ कलाकारासोबत एक वेगळी वाट .....Something’s Brewing ....!! Announcement soon ...#staytuned#lलवकरच

 

या कॅप्शनसोबत सलीलने शंकर महादेवन यांच्यासोबत फोटोही शेअर केला आहे. सलीलने ‘वेडिंगचा शिनेमा या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमात ऋचा इनामदार आणि शिवराज वायचळ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. शंकर महादेवन यांनी ‘कट्यार काळजात घुसली या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. आता हे दोघंही रसिकांसाठी काय सरप्राईज आणतात ते लवकरच कळेल.

Recommended

PeepingMoon Exclusive