By  
on  

लंडनमध्ये जाऊन या कलाकाराला धारण करावा लागला अरबी वेष

कलाकाराला अनेकदा अतरंगी भूमिका साकाराव्या लागतात. यासाठी कधी कधी वेगळा वेषही धारण करावा लागतो. अभिनेता सुव्रत जोशीलाही असं वेषांतर करावं लागलं. पण सुव्रतला एका अरबाचा लूक घ्यावा लागला. एका अरबी पत्रकाराची भूमिका साकारण्यासाठी सुव्रतने हा लूक घेतला होता. एका अ‍ॅडफिल्मसाठी सुव्रत अरबी बनला होता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

नाही! दुबईला टुरिस्ट म्हणून जाऊन शेखांचा झगा घालून काढलेला फोटो नाहीये हा! मी लंडन मध्ये नुकत्याच केलेल्या एका ad film मधला costume आहे हा! होय मी एका अरबी पत्रकाराचं काम केलं त्यात. मी मध्य आशियामधील दिसतो याचा global पुरावा! (हे सगळं तुम्हाला वाटतंय तेवढंच चमत्कारीक, विनोदी आणि नवीन आहे माझ्यासाठीही!) वल्लाह! #london #advertisement #uk

A post shared by Sula (@suvratjoshi) on

 

या मजेदार पोस्टला कॅप्शन देताना सुव्रत म्हणतो, 
‘नाही! दुबईला टुरिस्ट म्हणून जाऊन शेखांचा झगा घालून काढलेला फोटो नाहीये हा! मी लंडन मध्ये नुकत्याच केलेल्या एका ad film मधला costume आहे हा! होय मी एका अरबी पत्रकाराचं काम केलं त्यात. मी मध्य आशियामधील दिसतो याचा global पुरावा! (हे सगळं तुम्हाला वाटतंय तेवढंच चमत्कारीक, विनोदी आणि नवीन आहे माझ्यासाठीही!)  
वल्लाह! ‘ सुव्रतने काही दिवसांपुर्वीच अभिनेत्री सखी गोखले सोबत लग्न केलं आहे. तो ‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येतो.

Recommended

PeepingMoon Exclusive