By  
on  

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीच्या घरी झालं बाप्पाचं आगमन, ‘पीपिंगमून मराठी ’च्या प्रेक्षकांना दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

सध्या गणेशोत्सवामुळे सगळीकडे असलेल्या उत्साहपुर्ण वातावरणाचा आनंद घेण्यास सेलिब्रिटीही मागे नाहीत. अभिनेता स्वप्नील जोशीही बाप्पांच्या स्वागताला सिद्ध झाला आहे. स्वप्नीलच्या घरी पंचधातुचे गणपती बाप्पा विराजमान होत असतात.

त्यामुळे शाडू किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मुर्तीला फाटा देत स्वप्नीलचा पंचधातूचा बाप्पा ख-या अर्थाने इको फ्रेंडली ठरतो. स्वप्नील मुळातच पर्यावरण प्रेमी आहे. त्यामुळे आपल्याकडून पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान होईल याची दक्षता घेतो.

 

तो अलीकडेच ‘मोगरा फुलला’ या सिनेमात दिसला होता. त्या सिनेमातील त्याच्या व्यक्तिरेखेचं कौतुकही झालं होतं. स्वप्नीलने गणेशोत्सवानिमित्त ‘पीपिंगमून मराठी’च्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive