‘हिरकणी’मधील गाण्यात दिसणार शिवराज्याभिषेक सोहळ्याचा दिमाख

By  
on  

महाराष्ट्रातील जनतेला ज्या घटनेचा अत्यंत जाज्वल्य अभिमान आहे ती घटना म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. या सोहळ्याचं रसिकांना पुन्हा एकदा दर्शन घडणार आहे ते हिरकणी सिनेमातून. या सिनेमात शिवराज्याभिषेक गीत सादर होणार आहे. या गाण्यात 9 कलाकार, 6 लोककला सादर करणार आहेत. या गाण्याचा टीजर अभिनेता प्रसाद ओक याने सोशल मिडियावर शेअर केला आहे.

 

. या टीजरमध्ये शिवाजी महाराज कोण असणार आहेत हे समोर आलेलं नाही. पण एकंदरीत सेट आणि संगीत भव्य म्हणावं असंच आहे. या टीजरमध्ये चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, सुहास मुळे हे कलाकार दिसून येत आहेत. या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. त्यातच हे गाणं रिलीज होत असल्याने प्रेक्षकांच्या उत्साहात वाढ होईल यात शंका नाही. हा सिनेमा 24 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Recommended

Loading...
Share