....म्हणून 'शिवराज्याभिषेक' गाण्यासाठी प्रसाद ओक आणि अमितराज यांनी दिली नवोदित गायकांना संधी 

By  
on  

प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतंच या सिनेमातलं 'राज्याभिषेक' गाण्याचा सॉंग लाँच सोहळा नुकतंच पार पडला. या सोहळ्याला या गाण्यात झळकणारे कलाकार, संगीतकार अमितराज आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर राजेश मापुस्कर उपस्थित होते. 

यावेळी 'शिवराज्याभिषेक' गाण्याविषयी बोलताना प्रसाद म्हणाला,''शिवराज्याभिषेक गाण्यासाठी अमितराजने आणि मी सर्व नवोदित गायकांना संधी दिली. मी स्वतः माझ्या करियरची सुरुवात कोरस गायनाने केली आहे. त्यामुळे संगीत क्षेत्रातला स्ट्रगल मला माहित आहे. त्यामुळे मी या गाण्यासाठी नवोदित गायकांना प्रथम प्राधान्य दिलं.''

याच अनुभवाविषयी सांगताना 'हिरकणी' सिनेमाचा संगीतकार अमितराज म्हणाला,''मला लोकांनी पूर्ण गाणं ऐकावं याची अपेक्षा होती. हा भाग कोणी गायलाय असा विचार लोकांनी करू नये हा माझा उद्देश होता. त्यामुळे मला या गाण्यासाठी नवोदित गायक हवे होते. आणि योगायोग म्हणजे प्रसादला माझी हि कल्पना आवडली.''

अशाप्रकारे 'शिवराज्याभिषेक' गाण्याच्या अनुभवाविषयी प्रसाद ओक आणि अमितराज यांनी मोकळेपणाने आले अनुभव सांगितले. प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' हा सिनेमा २४ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share