Exclusive: ...म्हणुन तेजस्विनीने सिनेमात काम करणं कमी केलंय?

By  
on  

मराठी सिनेमातील 'गुलाबाची कळी' म्हणजे अभिनेत्री तेजस्विनी पंडीत. तेजस्विनी एक उत्तम अभिनेत्री आहेच शिवाय तिचा आणि अभिनेत्री अभिज्ञा भावेचा 'तेजाज्ञा' नावाचा फॅशन ब्रँड आहे. 

तेजस्विनी पंडीत कलावंत पथकात ढोलवादन करते. परंतु मागील दोन वर्षी तेजस्विनी ढोलवादनात सहभागी होऊ शकली नाही. परंतु यावर्षी सिद्धीविनायक गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत तेजस्विनीने ढोलवादन केलं. यावेळी पिपिंगमून मराठीशी एक्सक्लुझिव्हली बोलताना तेजस्विनीने तिच्या आजाराबद्दल सांगीतलं. 

तेजस्विनी म्हणाली,"माझे चाहते तक्रार करत होते की मी ढोलवादन करणं किंवा काम करणं कमी केलंय. तर मी गेले काही दिवस पाठीच्या दुखण्याने ग्रस्त होते. मी पाठीचा पट्टा घेऊन वावरायचे. त्यामुळे मी कुठेच सहभागी होऊ शकले नाही. परंतु आता मी नव्या ताकदीनीशी आली आहे."

अशाप्रकारे तेजस्विनीने पिपिंगमूनशी बोलताना तिच्या आजाराविषयी माहीती सांगीतली. पण आता तेजस्विनी बरी झाली असुन ती नवनवीन माध्यमात काम करण्यास उत्सुक आहे

Recommended

Loading...
Share