By  
on  

लंडनमध्ये गणेशोत्सवात गाजली अभिनेते विजय कदम यांची ‘खुमखुमी’

लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या मानाच्या गणपतीच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत अभिनेते विजय कदम यांनी समस्त लंडनवासियांसोबत आपल्या ‘खुमखुमी’ कार्यक्रमाचे दमदार सादरीकरण केले. या सादरीकरणासाठी लंडनमधील स्थानिक सहकलाकार आणि नृत्यांगना यांचे बहुमोल सहकार्य लाभले. या सगळ्यांच्या साथीमुळे लंडनमधील ‘खुमखुमी’ चांगलीच गाजली.

सौ. ओजस्वी केतकर भिडे, सौ. केतकी भट रानडे, सौ. रूपाली कवडे जगताप, सौ. जयश्री माळवे या नृत्यांगनांनी दिमाखदार लावण्या सादर करीत रसिकांची दाद मिळवली. कौस्तुभ वैद्य, निखिल कोरान्ने, विपुल गांगुर्डे या सहकलाकारांनी व्यावसायिक कलाकारांच्या तोडीची ‘खुमखुमी’तील प्रहसने सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. हार्मोनियम वादक सौ.स्वानंद नेवसे आणि ढोलकी तबल्यावर ज्ञानेश दाऊदखुणे यांनी ‘खुमखुमी’ सुरात अन् तालबद्द रंगवली.

महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमाप्रमाणेच Slough मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमही चांगलाच रंगला. या कार्यक्रमाची सांगता विजय कदम यांनी सादर केलेल्या भैरवीने झाली. Slough मित्र मंडळाच्या वतीने सचिन नेमाणे आणि अजय मुरूडकर बंधू यांनी आदरतिथ्य करत संपूर्ण कार्यक्रमासाठी उत्तम सहकार्य केले. हा संपूर्ण कार्यक्रम म्हणजे ‘हेचि दान देगा देवा’ असा होता.... अशा भावना अभिनेता विजय कदम यांनी व्यक्त करत लंडनमधील स्थानिक कलाकारांचे आभार मानले.

 

Recommended

PeepingMoon Exclusive