बिग बॉसमधील आठवणींनी आरोह वेलणकर झाला #nostalgic

By  
on  

बिग बॉसचा फिनाले होऊन काहीच दिवस लोटले आहेत. 100 दिवस एकत्र घरातील सर्व सदस्य त्यांच्या रुटीनमध्ये व्यस्त झाले आहेत. पण एका सदस्याला मात्र घराची आणि इतर सदस्यांची आठवण येते आहे. हा सदस्य म्हणजे आरोह वेलणकर. आरोहला घरच्यांची आठवण सतावत आहे. त्याने अलीकडेच सोशल मिडियावर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये आरोह म्हणतो, ‘बिग बॉसच्या घरातील आणखी एक आठवण. हा खुप उत्तम काळ होता आणि तो उत्तम व्यक्तींसोबत घालवला गेला. काहीही असलं तरी हा वेळ परत येऊ शकत नाही.’ आरोह वेलणकरची या घरात वाईल्ड कार्ड एंट्री झाली होती. पण कमी काळातच त्याने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. फायनल सिक्समध्ये आरोहची वर्णी लागली. पण टॉप 3मध्ये तो स्थान मिळवू शकला नव्हता.

Recommended

Loading...
Share