पाहा सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला विक्की वेलिंगकरचा फर्स्ट लूक

By  
on  

मराठी सिनेसृष्टीतली अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच एका आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'विक्की वेलिंगकर' असं ह्या सिनेमाचं नाव असून कौटुंबिक थ्रीलर पठडीतला हा सिनेमा असणार आहे. कथा आणि दिग्दर्शन सौरभ वर्मा यांचं असून सोनालीसोबतच या सिनेमात संग्राम समेळ आणि स्पृहा जोशीसुध्दा प्रमुख भूमिकेत आहेत. 

‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटाची नायिका ही आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहते, तिची हे कथा आहे,” असे उद्गार चित्रपटाचे दिग्दर्शक सौरभ वर्मा यांनी काढले. त्यांनी यापूर्वी ‘मिकी व्हायरस’ आणि ‘7 अवर्स टू गो’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

 

प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही या चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. सोनाली कुलकर्णीने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी आणि असेच अनेक गाजलेले मराठी चित्रपट तिच्या नावावर आहेत. ‘विक्की वेलिंगकर’ संपूर्ण महाराष्ट्र ६ डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

Recommended

Loading...
Share