१२५ आठवडे चाललेल्या 'माहेरची साडी' सिनेमाला झाली २८ वर्षं पूर्ण

By  
on  

लोकप्रिय 'माहेरची साडी' सिनेमा 18 सप्टेंबर 1991 रोजी प्रदर्शित झाला होता. आज या सिनेमाला 28 वर्ष पुर्ण झाली आहेत. या सिनेमाबद्दल आजही अनेक कथा, दंतकथा प्रचलित आहेत. 

या ब्लाॅकबस्टर सिनेमात अलका कुबल आठल्ये, किशोरी शहाणे, विक्रम गोखले, दिवंगत अभिनेते रमेश भाटकर आणि अजिंक्य देव आदी कलाकारांच्या प्रमुख भुमिका होत्या. या सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर त्या काळी या सिनेमाने प्रेक्षकांचे अलोट प्रेम मिळवले. तसेच तब्बल 125 आठवडे हा सिनेमा थिएटरमध्ये चालला होता. 

 

 

या सिनेमाविषयी ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक आणि समीक्षक दिलीप ठाकुरांशी बातचीत केले असता ते म्हणाले,"या सिनेमा ज्या थिएटरला झळकला होता तिथे लोकांची झुंबड उडायची. तसेच ग्रामीण भागात ज्या थिएटरला हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेथे गाडी, बैलगाडी, टमटम अशा मिळेल त्या वाहनाने लोकं त्या सिनेमागृहात सिनेमा पाहायला जायचे. तसेच गावातील एस.टी. सर्वप्रथम तालुक्यातील थिएटरला लोकांना सोडायची मग डेपोत जायची." 

या सिनेमाला आज 28 वर्ष पुर्ण होत आहेत. आजही या सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे हेच या 'माहेरची साडी'चे यश आहे.

Recommended

Loading...
Share