अमृता खानविलकरने जागवल्या तिच्या पहिल्या बॉलिवूड ऑडिशनच्या आठवणी

By  
on  

अभिनेत्री अमृता खानविलकरचे सितारे सध्या चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. एकापाठोपाठ हिट सिनेमा आणि मालिकेतील यशामुळे अमृता मराठी आणि बॉलिवूड दिग्दर्शकाची हॉट फेव्हरिट बनली आहे. ती नुकतीच ‘खतरों के खिलाडी’चं शूट संपवून बल्गेरियाहून परतली आहे. तिथून परतताच तिने मोहित सुरीच्या’मलंग’ च्या शुटिंगला सुरुवात केली आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@nehachaudhary_ #akinkkk10

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar) on

यावेळी मोहितसोबत काम करण्याचा हा दुसरा अनुभव असल्याचं तिने यावेळी स्पष्ट केलं. अमृताने यापुर्वी मोहित सुरीच्या ‘कलयुग’ सिनेमासाठी ऑडिशन दिलं होतं. विशेष म्हणजे हा अमृताचं पहिलंच बॉलिवूड ऑडिशन होतं. त्यावेळी काही कारणाने अमृता हा सिनेमा करू शकले नव्हती. पण आता मलंगच्या निमित्ताने हा योग जुळून आल्याचं दिसत आहे. मलंगमध्ये अमृतासोबत आदित्य रॉय कपूर, दिशा पाटणी आणि अनिल कपूर हे कलाकार देखील आहेत. याशिवाय अमृता सचिन कुंडलकरच्या ‘पाँडिचेरी’ या सिनेमातूनही रसिकांसमोर येणार आहे.

Recommended

Loading...
Share