By  
on  

विदर्भातील झाडीपट्टी थिएटरची कहाणी सांगणारा 'झॉलीवूड' सिनेमा

विदर्भ म्हटलं की शेतकरी आत्महत्या, दुष्काळ यांसारख्या बातम्या नेहमी चर्चेत असतात. परंतु आगामी मराठी सिनेमातून विदर्भाची एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विदर्भ सांस्कृतिक आणि थिएटरदृष्ट्या किती श्रीमंत आहेत याची कहाणी आगामी मराठी सिनेमातून पाहायला मिळणार आहे. तृषान्त इंगळे यांचा पहिला मराठी सिनेमा 'झॉलिवूड' मधून विदर्भातील झाडपट्टी या जुन्या आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या थिएटर फेस्टिवलची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

विदर्भातील झाडीपट्टी थिएटरमुळे अनेक स्ट्रगलिंग कलाकारांना आपली कला लोकांपर्यत पोहोचवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळालं. बॉलिवूड आणि मराठी सिनेमांप्रमाणे विदर्भात झाडीपट्टी थिएटर लोकप्रिय आहे. विदर्भातील कलाकारांनी झाडीपट्टी थिएटर अजून कसं जिवंत ठेवलय याचीही कहाणी 'झॉलिवूड'मधून पाहायला मिळणार आहे. 

 

Recommended

PeepingMoon Exclusive